११ ऑगस्ट २०२५ – एस. व्ही. पी. एम. कॉलेज ऑफ फार्मसी माळेगांव (बु ) ता. बारामती येथे आज डिप्लोमा व डिग्री फार्मसी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास इछुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महिन्याच्या फाउंडेशन कोर्सचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला. या कोर्सचा उद्देश विद्यार्थ्यांना फार्मसी व्यवसायाच्या शैक्षणिक, व्यावसायिक व नैतिक पैलूंविषयी सखोल मार्गदर्शन करणे तसेच प्रवेश प्रक्रिये संबंधी माहिती देणे हा आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी विद्यार्थ्यांना फाउंडेशन कोर्सचे शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्व सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी चर्चांमध्ये व प्रशिक्षणात्मक उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदविला. अद्याप इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना या फाउंडेशन कोर्समध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध आहे.
हा फाउंडेशन कोर्स विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमाची ओळख करून देत नाही, तर सक्षम, जबाबदार आणि समाजाभिमुख आरोग्यसेवा व्यावसायिक बनण्यासाठी प्रेरणाही प्रदान करतो.