महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्रशिक्षण विभाग व आरोग्य विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्र पणदरे, उपकेंद्र माळेगाव आणि कॉलेज ऑफ फार्मसी, माळेगाव यांचे संयुक्त विद्यमाने मिशन युवा स्वास्थ अभियानांतर्गत कोविड १९ लसीकरण शिबीराचे आयोजन शिवनगर विद्या प्रसारक मंडळ माळेगाव बु शैक्षणिक संकुलाचे शरद सभागृहात दिनांक २७ आक्टोंबर २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता विद्यार्थी,कर्मचारी व नागरिक यांचे सोयीसाठी करण्यात आले आहे. तरी १८ वर्षा वरील पात्र सर्व विद्यार्थी, कर्मचारी व परिसरातील नागरिक यांनी प्रथम व द्वितीय लसीकरण डोस घेणेसाठी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे संस्थेतर्फे व शासनाचे वतीने आवाहन करण्यात येत आहे. सोबत आधार कार्ड आणणे आवश्यक आहे. उपाध्यक्ष, विश्वस्त मंडळ,सचिव, व सर्व प्राचार्य