Part 3: Student Financial Support (विद्यार्थी आर्थिक सहाय्य)
| 1.Scholarship Support & Guidance :
The institute offers dedicated assistance to help student’s access government scholarships such as EBC, OBC, NT, SC, and ST, covering both tuition fees and hostel expenses. A specialized scholarship section ensures students receive timely updates, support with documentation, and help with resolving queries through efficient online assistance. |
शिष्यवृत्ती मार्गदर्शन व सहाय्य :
संस्था विद्यार्थ्यांना EBC, OBC, NT, SC आणि ST अशा शासकीय शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी विशेष सहाय्य प्रदान करते. या शिष्यवृत्तींमध्ये महाविद्यालयीन फी तसेच वसतिगृह खर्चाचा समावेश आहे. शिष्यवृत्ती विभाग विद्यार्थ्यांना वेळोवेळी आवश्यक माहिती देतो, कागदपत्रांची पूर्तता करण्यात मदत करतो तसेच ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी तत्पर सेवा उपलब्ध करून देतो. |
| Institute Scholarship (2025-26) :
The Shri Sharadchandra Pawar Scholarship supports meritorious and financially deserving students, empowering them to pursue their education with confidence. In academic year 2025-26, 23 deserving students got scholarship. |
संस्थेची शिष्यवृत्ती (२०२५-२६) :
श्री शरदचंद्र पवार शिष्यवृत्ती गुणवंत व आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना दिली जाते, ज्यामुळे त्यांना आत्मविश्वासाने शिक्षण पुढे चालू ठेवता येते. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये २३ पात्र विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. |
| NGO Scholarships(2024–25):
Beyond government scholarships, 58 students benefited from financial support worth approximately Rs.16.5 lakh in the academic year 2024–25. These scholarships, awarded by reputed organizations such as Lakmé, SBI, Leela Poonawalla Foundation, and Jijau Foundation, significantly enhanced students’ access to quality education and eased their financial burden. |
स्वयंसेवी संस्था(NGO) शिष्यवृत्ती(२०२४–२५):
शासकीय शिष्यवृत्त्यांव्यतिरिक्त, शैक्षणिक वर्ष 2024–25 मध्ये ५८ विद्यार्थ्यांना अंदाजे रु. १६.५ लाखांची आर्थिक मदत मिळाली. लॅक्मे, एसबीआय, लीला पुणेवाला फाउंडेशन आणि जिजाऊ फाउंडेशन यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांकडून मिळालेल्या या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा मार्ग सुलभ झाला आणि त्यांचा आर्थिक भार कमी झाला. |